S M L

आघाडी सरकारचा विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका

Samruddha Bhambure | Updated On: Jun 16, 2014 10:47 AM IST

आघाडी सरकारचा विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका

ghatkopaer mumbai flyover16   जून :  मुंबईकरांसाठी एक खुष खबर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारचा विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे. पांजरपोळ ते घाटकोपर फ्लायओव्हर आणि खेरवाडी फ्लायओव्हरचं आज वाहुतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या दोन्ही फ्लायओव्हरचं उद्धघाटन आज दुपारी होणार आहे.

सततच्या ट्रॅफिक जॅमने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना आता सीएसटी ते घाटकोपर अंतर अवघ्या तीस मिनटांत पार करता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर वांद्रे येथील खेरवाडी फ्लायओव्हर देखिल वाहतूकीसाठी खुला होतं आहे. त्यामुळे खेरवाडी सिग्नलला ट्रॅफिक जॅम दूर होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2014 09:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close