S M L

नाईकांच्या जाचाला कंटाळून माजी आ.म्हात्रेंचा राष्ट्रावादीला रामराम !

Sachin Salve | Updated On: Jun 16, 2014 06:55 PM IST

नाईकांच्या जाचाला कंटाळून माजी आ.म्हात्रेंचा राष्ट्रावादीला रामराम !

35manda mhatre16 जून : एककीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली तर दुसरीकडे पक्षातील कार्यकर्ते वरीष्ठ नेत्यांच्या जाचाला कंटाळून पक्षाला सोडचिट्टी देत आहे.

 

राष्ट्रवादीच्या माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. राज्याचे उत्पादनशुल्क मंत्री आणि नवी मुंबईचे आमदार गणेश नाईक यांच्या जाचाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं मंदा म्हात्रे यांनी सांगितलंय.

 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे म्हात्रे यांनी राजीनामा सोपवलाय. काही दिवसांपूर्वी नाईक आणि म्हात्रे यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली होती. त्यामुळे नाराज म्हात्रे यांनी पक्षत्याग करुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2014 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close