S M L

मायकल शूमाकर कोमातून बाहेर

Sachin Salve | Updated On: Jun 16, 2014 09:04 PM IST

मायकल शूमाकर कोमातून बाहेर

5maikel_shumakar16 जून : फॉर्मुला वनचा बादशाह मायकल शूमाकर मृत्यूवर मात करुन कोमातून बाहेर आला आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात फ्रांसमध्ये स्किइंग करताना झालेल्या अपघातात शूमाकर कोमात गेला होता. पण वेगाचा हा बादशाह मृत्यूशी झुंज देऊन तब्बल सहा महिन्यानंतर कोमातून बाहेर आला आहे. शूमाकरला हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आला आहे.

शूमाकरच्या व्यवस्थापकांनीही याला दुजोरा दिला असून शुमाकरची तब्येत ठीक असल्याचं सांगितलंय. शूमाकरच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शुमाकर फ्रांन्समधील ग्रेनोबल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. आज शूमाकर अखेर कोमातून बाहेर आला. त्याला डिस्चार्ज देण्यात आला. शूमाकरवर यापुढे काही दिवस घरीच उपचार दिले जातील. त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टारांचे आभार मानले तसंच शुमाकरच्या चाहत्यांच्याही आभार मानले.

शूमाकरमागील वर्षी डिसेंबर महिन्यात फ्रान्समध्ये आप्ल्स पर्वतावर स्किइंग करत होता. त्यावेळी एका झाडाला धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झाला होता. स्किइंग करत असताना शूमाकरचा वेग 60 किलोमीटर प्रतितास इतका होता. झाडाला धडक दिल्यामुळे शूमाकरच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यांच्या चाहत्यांनी त्याला तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. 6 महिने मृत्यूशी झुंज देऊन वेगाचा हा बादशाह आता सुखरुप परतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2014 08:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close