S M L

मुंबईकर सुसाट, सीएसटी ते घाटकोपर अर्ध्यातासात !

Sachin Salve | Updated On: Jun 16, 2014 10:55 PM IST

मुंबईकर सुसाट, सीएसटी ते घाटकोपर अर्ध्यातासात !

224Panjarpol Ghatkopar Link Road16 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने विकासकामांच्या उद्घाटनाचा धडका लावलाय. मुंबईत आज (सोमवारी) दोन नवीन फ्लायओव्हर्स जनतेसाठी खुले करण्यात आले आहे.

 

ईस्टर्न फ्रीवेचा भाग असलेला पांजरपोळ ते घाटकोपर फ्लायओव्हरचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दुपारी उद्घाटन केलं. याआधी ऑरंज गेट ते चेंबूरमधल्या शिवाजी चौकापर्यंत फ्रीवे सुरू होता. आता फ्रीवे थेट घाटकोपरपर्यंत पोहोचलाय.

 

यामुळे आता सीएसटी ते घाटकोपर हा प्रवास अर्धा ते पाऊण तासात पूर्ण करता येणार आहे. हाच प्रवास जर इस्टर्न एक्प्रेस हायवेनं केला तर सकाळी आणि संध्याकाळी याला एक ते दीड तास लागतो तर दुसरीकडे बांद्रा पूर्व भागातल्या खेरवाडी फ्लायओव्हरचंही मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं. यामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणार्‍या मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. काही महिन्यांपूर्वी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडही उद्घाटनाशिवाय जनतेसाठी खुला करण्यात आला होता.

या फ्लायओव्हरमुळे मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर होणार ?

ईस्टर्न फ्री वे-दुसरा टप्पा

  • - चेंबूर पांजरपोळ ते घाटकोपर
  • - एकूण 3 किलोमीटरचा मार्ग
  • - प्रतिदिवस या रस्त्यावरून 60 हजार वाहनक्षमता करू शकतात प्रवास
  • - प्रकल्पाची किंमत - 293 कोटी रूपये
  • - विनासिग्नल प्रवास - आँरेज गेट ते घाटकोपर - एकूण 17 किलोमीटर
  • - पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडी फूटणार

वांद्रे खेरवाडी जंक्शन फ्लायओव्हर

  • - अंधेरीहून वांदे्रला जाण्यासाठी विनासिग्नल प्रवास
  • - प्रकल्पाची किंमत - 21 कोटी 96 लाख रूपये
  • - 225 दिवसात या विक्रमी वेळेत केलं काम पूर्ण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2014 10:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close