S M L

'जनतेनं सुता सारखे सरळ करुनही राज काही शिकले नाही'

Sachin Salve | Updated On: Jun 16, 2014 11:21 PM IST

'जनतेनं सुता सारखे सरळ करुनही राज काही शिकले नाही'

16 जून : महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या, मी सुतागत सरळ करतो म्हणणार्‍यांनाच लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने सरळ केले आहे, लोकांनी धडा शिकवला असूनही ते त्यातून काहीच शिकले नाहीत असं सणसणीत प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं. संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ आहे असं म्हणणार्‍यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलीय का, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

 

रविवारी राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत राजगर्जना या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी राज यांनी पोलीस भरती दरम्यान चौघांचा मृत्यू झाला या प्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर निशाना साधला. पोलीस भरतीसाठी राज्यभरातून तरुण मुंबईत येतात. उपाशीपोटी असताना त्यांना 5 किलोमीटर पळवतात. गृहमंत्री आर.आर.पाटील 100 मीटर तरी धावू शकतील का ? असा खोचक टोला राज यांनी लगावला होता. राज यांच्या विधानाचा आबांनी आपल्या स्टाईलने प्रत्युत्तर देत राज यांची खिल्ली उडवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2014 11:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close