S M L

दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी

Samruddha Bhambure | Updated On: Jun 17, 2014 04:44 PM IST

दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी

17 जून : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात अपेक्षेप्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल 88.32 टक्के इतका लागला आहे. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकण विभागाने बाजी मारलीय तर लातूर पॅटर्न फेल ठरला आहे.

विभागीय मंडळ टक्केवारी

 • नाशिक - 89.15
 • लातूर - 81.68
 • कोकण - 95.57
 • अमरावती - 84.11
 • कोल्हापूर - 93.83
 • मुंबई - 88.84
 • पुणे -92.35
 • मुंबई - 88.84
 • नागपुर - 82.93
 • औरंगाबाद - 87.06

यंदाही मुलींची बाजी राज्यभरात उत्तीर्ण प्रमाण

 • मुली – 90.55
 • मुले – 86.47

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2014 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close