S M L

राज 'जागे' झाले, 6 वाजेपासून कामाला लागले

Sachin Salve | Updated On: Jun 17, 2014 11:46 PM IST

राज 'जागे' झाले, 6 वाजेपासून कामाला लागले

44raj)thackrey_news17 जून : मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे राज यांनी आपल्या दिनक्रमात कमालीचा बदल केला आहे. आजपर्यंत राज ठाकरे उशिरापर्यंत झोपता अशी टीका होती त्यामुळे राज यांनी आताही सवयच मोडून टाकली आहे. उशिरापर्यंत झोपण्याची टीका होणारे राज रोज 6 वाजता उठतात. त्यानंतर आपल्या शिलेदारांना घेऊन बैठकही घेता.

लोकसभेत सुपडा साफ झाल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता चांगलेच जागे झाले आहे. उशिरापर्यंत झोपण्याच्या टीकेला सामोरं जाणारे राज आता रोज सकाळी 6 वाजता उठताय. मुख्यमंत्रिपदासाठी नाव जाहीर केल्यानंतर राजनी आपला दिनक्रम बदलला.

 

सकाळी 6 वाजता राज यांच्या पहिल्या बैठकीला सुरुवात होते. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर, नितीन सरदेसाई, स्वीय सहाय्यक,जनसंपर्क अधिकारी अशी टीम सकाळीच या बैठकीला हजर असते. या बैठकीत जिल्हा निहाय नेत्यावर चर्चा, कामाची माहिती, प्रत्येक जिल्ह्यातल्या नेत्याचा आढावा. नाशिक, कल्याण आणि ठाणे आणि मुंबई नगरसेवकाच्या कामाचा आढावा रोज घेतला जातोय. पक्ष बांधणीच मोठ आव्हान राज यांच्या समोर आहे. हे पाहाता या बैठकीतून आलेल्या निष्कर्षातून संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता आमदारकी लढवायची, मुख्यमंत्री व्हायचंय त्यामुळे सवय तर मोडावी लागणार त्यामुळे राज आता लवकर झोपतात आणि सकाळी सहालाच उठतात आणि कामाला लागतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2014 11:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close