S M L

मेक्सिकोने ब्राझीलला रोखले, मॅच ड्रॉ !

Samruddha Bhambure | Updated On: Jun 18, 2014 04:12 PM IST

मेक्सिकोने ब्राझीलला रोखले, मॅच ड्रॉ !

paulinho_sav18 जून : घरच्या मैदानावर ब्राझीलने पहिल्या सामन्यात विजयी सलामी देऊन आपणच वर्ल्डकपसाठी दावेदार असल्याचं सिद्ध करुन वर्ल्ड कप चषकाकडे कूच केली मात्र मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात मेक्सिकोने चिवट झुंज देत बलाढ्या ब्राझीलला अक्षरश: रोखले. मेक्सिको आणि ब्राझील यांच्यात झालेली मॅच एकही गोल न होता ड्रॉ झाली.

ब्राझीलने त्यांच्या नेहमीच्या धडाक्यात मॅचला सुरुवात केली. पण मेक्सिकन गोलकिपर ओचाने ब्राझीलचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. नेयमारने मारलेला हेडर गोलपोस्टमध्ये जाणार असं वाटत असतानाच ओचाने उजवीकडे झेप घेत बॉल अडवला. नेयमारने गोल करण्याचे भरपूर प्रयत्न केले पण ओचाच्या चपळ गोलकिपिंगमुळे ब्राझीलला एकही गोल करता आला नाही, त्यामुळे ही मॅच ड्रा झाली. मॅच ड्रॉ जरी झाली असली तरी दोन्ही संघासाठी आणखी एक एक संधी बाकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2014 03:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close