S M L

आघाडी असावी की नसावी हे काँग्रेसनेच ठरवावं -जाधव

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2014 07:12 PM IST

 आघाडी असावी की नसावी हे काँग्रेसनेच ठरवावं -जाधव

f44bhaskar_jadhav18 जून : काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपावरुन धुसफूस सुरुच आहे. राष्ट्रवादीला खुमखुमी असेल तर त्यांनी स्वबळावर लढावं, असं आव्हान पतंगराव कदम यांनी दिलं होतं. त्यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी उत्तर दिलंय.

आघाडी असावी की नसावी हे आता काँग्रेसनंच ठरवावं, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला. राष्ट्रवादीची वाढीव जागांची मागणी योग्यच आहे असंही जाधव म्हणाले.

तसंच पतंगरावांचं खुमखुमीबद्दलचं विधान धक्कादायक आहे. त्यांनी जबाबदारीनं बोलावं, असा सल्लाही भास्कर जाधवांनी दिला. काँग्रेसचा 1999 प्रमाणे स्वतंत्र लढण्याकडे कल असल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादीनंही त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.21 जूनला राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. येत्या 15 दिवसांत राष्ट्रवादी आघाडीबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2014 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close