S M L

डॉ.होमी भाभांच्या बंगल्याचा 372 कोटींना लिलाव

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2014 11:12 PM IST

डॉ.होमी भाभांच्या बंगल्याचा 372 कोटींना लिलाव

उदय जाधव, मुंबई.

18 जून : भारतीय अणू ऊर्जेचे जनक डॉ. होमी भाभा यांचं मुंबईतील बंगल्याचा आज (बुधवारी) लिलाव झाला. तब्बल 372 कोटी रुपयांना हा बंगला विकला गेला. सध्या बंगल्याची मालकी असलेल्या एनसीपीएने हा बंगला खासगी मालमत्ता असल्याचे सांगून विकला असला तरी कोर्टाचा निर्णय अजून बाकी आहे. त्यामुळे भारतीय अणू ऊर्जेचे जनक होमी भाभा यांच्या बंगल्याचा लिलाव करण्यास विरोध करणार्‍यांनी अजून धीर सोडलेला नाही.

भारताच्या सर्वांगीन विकासात ऊर्जेची मोठी गरज होती. ही गरज अणू ऊर्जेच्या माध्यमातून स्वबळावर निर्माण करुन, डॉ. होमी भाभांनी भारताला जगातल्या मोजक्या देशांच्या पंक्तीत बसवलं. याच होमी भाभांचं मुंबईत मलबार हिल भागात मेहरांगीर बंगला आहे. आज हा बंगला डॉ. भाभा यांच्या मृत्यू नंतर एनसीपीए ट्रस्टच्या ताब्यात आहे.

आज हा बंगला एनसीपीएने जाहीर लिलाव करत 372 कोटी रुपयांना विकला. मात्र, एनसीपीएने केलेल्या या लिलावाचा अणू ऊर्जा आयोगातील कर्मचारी संघटनांनी विरोध करत निदर्शनेही केली.

होमी भाभा यांचं घर एक वैज्ञानिक वस्तुसंग्रहालय बनावं अशी मागणी शिवसेनेने केलीय. पण मुख्यमंत्री आश्वासन देण्या पलीकडे दुसरे काहीच करताना दिसत नाहीत. राष्ट्र उभारणीत ज्या शास्त्रज्ञांनी आयुष्य पणाला लावलं, त्या शास्त्रज्ञांसाठी सरकार किती संवेदनशील आहे, हे या लिलाव प्रकरणावरुन दिसून आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2014 09:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close