S M L

महाराष्ट्राच्या राज्यपालांचा राजीनामा देण्यास नकार

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2014 09:25 PM IST

महाराष्ट्राच्या राज्यपालांचा राजीनामा देण्यास नकार

k sankaranarayanan18 जून : यूपीए सरकारने केलेल्या राज्यपालांच्या नियुक्त्या रद्द करण्याची किंवा त्यांची बदली करण्याची प्रक्रिया नरेंद्र मोदी सरकारने हाती घेतलीय. उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल.जोशी यांनी राजीनामा दिला. त्यांच्यापाठोपाठ आज (बुधवारी) राज्यपाल के. शंकरनारायणन यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलंय.

केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी यासंदर्भात राज्यपालांशी फोनवरुन बातचीत केली. पण राष्ट्रपती भवनाकडून निरोप आल्यानंतर राजीनामा देणार असल्याची राज्यपालांची भूमिका आहे अशी राजभवनाच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली आहे.

मोदी सरकारने मंगळवारी यूपीए सरकारने नियुक्त केलेले राज्यपाल हटवण्याची मोहीम सुरू केली. यामुळे सर्वात पहिले उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी. एल. जोशी यांनी राजीनामा दिला. पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांची बदली होऊ शकते किंवा त्यांना काढूनही टाकलं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज आणि आसामचे राज्यपाल जे बी पटनाईक यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. ते आताच राजीनामा देणार नाही असं कळतंय. राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांचीही उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित यांनी मात्र राजीनाम्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडवर सोपवलाय.

या प्रकरणावर शंकरनाराणन म्हणतात,

'लोकशाहीत कुणालाच कायमचं पद मिळत नाही. राज्यपालपदाबद्दलच्या ज्या अफवा पसरल्या आहेत तो घटनात्मक पदाचा अपमान आहे. योग्य संस्थेकडून विचारणा झाली तर योग्य पाऊल उचलेल.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2014 07:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close