S M L

5 तरुणांचे बळी घेऊनही धावण्याची स्पर्धा रद्द नाहीच !

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2014 10:19 PM IST

5 तरुणांचे बळी घेऊनही धावण्याची स्पर्धा रद्द नाहीच !

18 जून : पोलीस भरती दरम्यान पाच जणांचा बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली आहे. आता धावण्याची स्पर्धा घेण्याआधी उमेदवाराची मेडिकल टेस्ट घेतली जाणार आहे तसंच ही स्पर्धा संध्याकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी घोषणा मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी केली. मात्र 3 किलोमीटर धावण्यात स्पर्धा रद्द करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

धावण्याची स्पर्धा 2011 पासून घेतली जात असल्याचंही राकेश मारिया यांनी सांगितलंय. ही संपूर्ण प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार घेतल्याचं ते म्हणाले. पोलीस भरतीत जे 5 बळी गेले आहेत त्यासंबंधी पोलीस सहआयुक्त सदानंद दाते चौकशी करणार आहेत असंही मारियांनी स्पष्ट केलं.

पोलीस भरती दरम्यान विशाल केदारे, अंबादास सोनावणे, गहिनीनाथ लटपटे या तरुणांसह इतर दोघांना भोवळ आली होती त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असं उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज बीडच्या गहिनीनाथ लटपटे या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. 5 किलोमीटर धावण्याची स्पर्धा बंद करण्यात यावी अशी मागणी मात्र विरोधकांनी लावून धरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2014 10:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close