S M L

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, सेनेची गर्जना

Sachin Salve | Updated On: Jun 19, 2014 04:42 PM IST

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, सेनेची गर्जना

sena_@_4819 जून : लोकसभेत दणदणीत विजय मिळवल्यानंतर शिवसेनेनं आता अधिक आक्रमक होतं विधानसभेसाठी मोर्चेबांधणीला लागलीय.शिवसेनेच्या 48 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होईल अशी गर्जना युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलीय. मुख्यमंत्री कोण हवा यापेक्षा तो शिवसेनेचाच हवा, असं मतही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलंय.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात नवचैत्यन निर्माण करण्याच्या दृष्टीन सेनेचे विशेष प्रयत्न सध्या सुरू आहेत. आगामी निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवावी असा सूर सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात दिसून आलाय. या सर्व पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

दरम्यान, महायुतीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे दिलं तर महायुतीला प्रचंड बहुमत मिळेल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही व्यक्त केला आहे. तर सेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून महाराष्ट्रात शंभर टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री देणार असं वचन देण्यात आलंय.

'सामना'तून वचन

 

"देशात जसे नरेंद्र मोदींचे एकहाती व एककलमी राज्य पूर्ण बहुमताने आले तसे एकवचनी पूर्ण बहुमताचे भगवे राज्य शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात यावे ही येथील तमाम जनतेची इच्छा आहे. कारण महाराष्ट्रात भक्कम महायुतीचे नेतृत्व शिवसेना करीत आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने शिवसेनेवरील या विश्‍वासाची चुणूक दाखविली आहे. शिवसेनेने लोकसभेच्या १८ जागा जिंकल्या. या भव्य विजयाचे शिल्पकार राज्यातील तमाम शिवसैनिक आहेत. तहान-भूक हरपून त्यांनी जी मेहनत घेतली, त्यामुळे मोदी सरकारला महाराष्ट्राचा भक्कम आधार लाभला. आम्ही महाराष्ट्राला शंभर टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री देणार आहोत, हे आमचे वचन आहे. मोदी यांच्या रूपाने दिल्लीच्या तख्तावर एक मजबूत पंतप्रधान लाभला. आता महाराष्ट्राच्या मजबुतीचा विडा उचलून शिवसेनेने विजयाचा बेलभंडारा उचलला आहे."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2014 03:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close