S M L

पंकजा मुंडे भाजपच्या कोअर कमिटीत

Sachin Salve | Updated On: Jun 19, 2014 04:32 PM IST

पंकजा मुंडे भाजपच्या कोअर कमिटीत

pankaja_munde_palwe19 जून : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सेनेचा वर्धापन दिन सुरू आहे तर दुसरीकडे भाजपच्या कोअर कमिटीही एक महत्त्वाची बैठकही नुकतीच पार पडली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कोअर कमिटीतल्या रिकाम्या जागेवर त्यांची मुलगी पंकजा मुंडे-पालवे यांची निवड करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे पंकजा यांनी खासदारकी लढवावी आणि त्यानुसार त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळावं या संदर्भात विनंती केंद्राकडे केल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतरची कोअर कमिटीची ही पहिलीच बैठक होती.

विनोद तावडेंच्या घरी ही बैठक केंद्रीय निरीक्षक व्ही.सतीश यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभेच्या तयारीचा आढावा घेण्यात आल्याचा कळतंय. या बैठकीला राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थिती होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2014 03:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close