S M L

कालही चांगलं काम केलंय,आजही करतोय -अजित पवार

Sachin Salve | Updated On: Jun 19, 2014 05:49 PM IST

कालही चांगलं काम केलंय,आजही करतोय -अजित पवार

19 जून : चितळे समितीच्या सिंचन घोटाळ्याच्या अहवालात जलसंपदा खात्यावर ताशेरे ओढण्यात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही अनियमिततेमुळे ठपका ठेवण्यात आलाय. पण अजित पवारांनी आपण चांगलं काम केल्याचा दावा केला. मी कालही चांगलं काम केलंय, आजही करतोय आणि उद्याही करणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच माझ्या सारख्या कार्यकर्त्याला अहवालानंतर क्लीन चिट मिळाली की, त्याचं राजकारण करायचं असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. अजित पवार जलसंपदा मंत्री असतानाच्या काळात झालेल्या प्रकल्पांचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. डॉ. माधवराव चितळे यांनी आपल्या अहवालात सिंचन क्षेत्रातल्या अनेक अनियमिततेवर बोट ठेवलंय. अजित पवार हे जलसंपदा मंत्री असतानाच्या काळात तर बिनकामाचे सिंचन 34 पटीने वाढल्याचं चितळे समितीच्या अहवालात म्हटलं आहे पण अजित पवारांनी पहिल्यांदाच या अहवालावर आपली प्रतिक्रिया दिली आणि आपण चांगलं काम केलं असल्याचा दावा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2014 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close