S M L

नितीन आगेचा शवविच्छेदन अहवाल संशयास्पद

Sachin Salve | Updated On: Jun 19, 2014 10:40 PM IST

 nitin_aage19 जून : जातीयवादातून हत्या करण्यात आलेल्या नितीन आगेचा शवविच्छेदन अहवाल संशयास्पद असल्याचं पुढे आलंय. तब्बल दीड महिन्यांनंतर तेही दलित अत्याचार विरोधी समितीच्या हस्तक्षेपानंतर नितीनचा शवविच्छेदन अहवाल त्याच्या पालकांना मिळालाय.

 

पण त्याच्यातच अनेक त्रुटी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे रिपोर्ट देण्यास टाळाटाळ करणारी पोलीस यंत्रणा संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा गावात नितीनची हत्या करून त्याचा मृतदेह झाडाला टांगून ठेवण्यात आला होता. त्याच्या मृतदेहावर अनेक जखमा असल्याचं त्याच्या पालकांचं आणि प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं होतं.

 

मात्र, त्यापैकी कशाचाच उल्लेख त्याच्या शवविच्छेदन अहवालामध्ये नाही. उलट, मारहाणीच्या जखमांमुळे त्याचे कपडे रक्तानं माखलेले असता नाही. या रिपोर्टमध्ये तो रकाना रिकामा ठेवण्यात आलाय. गळा आवळल्याने मृत्यू एवढाच त्यात उल्लेख आहे. त्यामुळे तपासात त्रुटी ठेवण्यासाठी मदत करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांविरोधातही गुन्हा दाखल करावा अशी नितीनच्या पालकांची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2014 10:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close