S M L

इराक : 'त्या' 40 भारतीयांचा ठावठिकाणा सापडला

Sachin Salve | Updated On: Jun 20, 2014 11:31 AM IST

इराक : 'त्या' 40 भारतीयांचा ठावठिकाणा सापडला

2444iraq19 जून : इराकमध्ये 40 भारतीय नागरीकांचं अपहरण झालं असून त्यांचा आता ठावठिकाणा सापडला आहे. पण त्यांना आता लगेच परत आणू शकत नाही. इराकमधली परिस्थिती सध्या तशी नाही, असं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलंय.

 

या 40 जणांचा ठावठिकाणा आम्ही आता जाहीर करू शकत नाही, असंही परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं. तसंच या कर्मचार्‍यांसह 40 भारतीय नर्सेसही अडकल्या आहेत. या नर्सेस सुरक्षित आहेत. त्यांना आम्ही घरातच रहा म्हणून सांगितलंय, अशी माहिती पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी दिली.

 

स्वराज आणि बादल यांनी नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. इराकमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चाललीय. परदेशी नागरीकांना टार्गेट करत आयसीस या दहशतवादी संघटनेनं 40 भारतीयांचं अपहरण केलंय. अपहरण झालेले बहुतांशी भारतीय 'तारिक उर अलहूद' या कंपनीत काम करणारे पंजाबचे कामगार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2014 10:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close