S M L

फास आवळला, 'कॅम्पा कोला'वर हातोडा पडणार

Sachin Salve | Updated On: Jun 19, 2014 11:23 PM IST

s33campa_cola19 जून : मुंबईतील वरळी येथील कॅम्पा कोला कम्पाऊंडवर अनधिकृत मजल्यांवर हातोडा पडणार हे आता स्पष्ट झालंय. कॅम्पा कोलावरील कारवाईसाठी दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. कॅम्पा कोलावर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस आता कामाला लागले आहेत.

 

इमारतीच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. याचाच अर्थ, कारवाई लवकरच होणार याचे पोलिसांकडून संकेत मिळाले आहेत. कॅम्पाकोलाच्या 102 अनधिकृत फ्लॅट्सवर कारवाई होणार आहे. कॅम्पाकोलाच्या पाचव्या मजल्याच्यावरील हे फ्लॅट्स आहेत. एकूण सात इमारतींमध्ये हे फ्लॅट्स आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2014 11:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close