S M L

मुंबईकरांचे 'बुरे दिन', लोकलचा पास दुपट्टीने महागला

Sachin Salve | Updated On: Jun 21, 2014 02:44 PM IST

मुंबईकरांचे 'बुरे दिन', लोकलचा पास दुपट्टीने महागला

21 जून : 'अच्छे दिन आने वाले हैं' असं स्वप्न मोदींनी दाखवलं होतं पण सरकार स्थापन होऊन महिना होत नाही तेच मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला पहिलाच झटका देत रेल्वेच्या दरात 14.2 टक्क्यांची घसघशीत वाढ केली. या दरवाढीत मुंबईकरांच्या खिशाला आता चांगलीच कात्री लागली आहे. मुंबईकरांच्या लाडक्या लोकलचा महिन्याचा पास हा थोडा थोडका नव्हे तर दुपट्टीने वाढला आहे.

चर्चगेट ते दादरपर्यंतचा सेकंड क्लासच्या प्रवासासाठी महिन्याला पूर्वी 115 रुपये मोजावे लागत होते ते आता तब्बल 330 रुपये मोजावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला आता तब्बल 215 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. सीएसटी ते ठाणेसाठी महिन्याला 190 रुपये मोजावे लागत होते आता 645 रुपये मोजावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला आता 455 रुपये मोजावे लागणार आहे.

फर्स्ट क्लासच्या प्रवासासाठी तर हेच दर आणखी महागले आहे. फर्स्ट क्लासचा चर्चगेट ते अंधेरीपर्यंतच्या प्रवासासाठी पूर्वी 580 रुपये मोजावे लागत होते ते आता तब्बल 1,310 रुपये मोजावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला आता 730 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. सीएसटी ते ठाणे असा प्रवास केला तर पूर्वी 655 रुपये मोजावे लागत होते ते आता 1,310 रुपये मोजावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला आता 655 रुपये अधिक द्यावे लागणार आहे.

पास महागला - सेकंड क्लास

प्रवास

पूर्वीचं भाडं         

आताचं भाडं

चर्चगेट-दादर    

115    

330

चर्चगेट-अंधेरी

190

480

चर्चगेट-विरार

280

645

सीएसटी-ठाणे

190

480

सीएसटी-कल्याण

280

645

सीएसटी-वाशी

240

640

सीएसटी-पनवेल

335

720

 

फर्स्ट क्लास

प्रवास

पूर्वीचं भाडं         

आताचं भाडं

चर्चगेट-दादर    

580

1310

चर्चगेट-अंधेरी

655

1310

चर्चगेट-विरार

1035

1960

सीएसटी-ठाणे

655   

1310

सीएसटी-कल्याण

965

1960

सीएसटी-वाशी

710

1320

सीएसटी-पनवेल

1035

1960

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2014 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close