S M L

आज लढत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये

20 एप्रिल, पोर्ट एलिझाबेथआयपीएलच्या दुस-या हंगामतल्या आठही टीमच्या प्रत्येकी एक मॅच झाल्या आहेत. आज सोमवारपासून या आठ टीमच्या दुस-या मॅचेस रंगणार आहेत. दुस-या मॅचेसमधली पहिली लढत रंगणार आहे ती बंगलोर रॉयल चॅलेंजर्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये.आयपीएलच्या पहिल्या हंगामात सातव्या क्रमांकावर असलेल्या बंगलोर रॉयल चॅलेंजर्सनं दुसर्‍या हंगामात मात्र दणक्यात सुरुवात केलीये. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी गतविजेत्या राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. केविन पीटरसन, राहुल द्रविड, जेसी रायडर असे तगडे बॅटसमन या टीमची जमेची बाजू आहेत. तर पहिल्या मॅचमध्ये पाच विकेट घेत अनिल कुंबळेनं सर्वचं टीमला इशारा दिला आहे. त्याच्या जोडीला प्रविण कुमार, रायडर असे दमदार बॉलर्सही आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2009 10:40 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2009 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close