S M L

अवकाशात झेपावला भारताचा पहिला अत्याधुनिक ' रि-सॅट 2 ' उपग्रह

20 एप्रिल, श्रीहरीकोट्टाश्रीहरीकोट्टा इथून भारताचा रि-सॅट 2 हा उपग्रह सकाळी अवकाशात सोडण्यात आला. अवकाशात सोडलेला हा भारताचा अतिशय आधुनिक असा हा उपग्रह आहे. सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी इस्रोतर्फे हा उपग्रह सोडण्यात आला. या उपग्रहाचं डिझाईन इस्रायली एरोस्पेस इंडस्ट्रीजतर्फे करण्यात आलंय. हा उपग्रह भारतासाठी संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे.दिवस असो की रात्र, ढगांचं जाड आवरण असो, पाऊस, किंवा अगदी धुक्याची जाड चादर असली तरीसुद्धा त्यातून जमिनीवरचे फोटो घेण्याची या उपग्रहाची क्षमता आहे. भारतीय लष्कराला रि-सॅट 2 या उपग्रहाचा विशेष फायदा होणार आहे. नकाशा तसंच सामुदि्रक हालचालींचा सर्व्हे याचबरोबरच नैसर्गिक संकटांच्या पूर्वसूचनाही याद्वारे मिळणार आहेत. भारताचा पहिलाच स्पाय सॅटेलाईट असलेल्या या रिसॅटमध्ये सिंथेटिक रडारचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे विशेष करून अतिरेक्यांचे छुपे कॅम्प्स्, सीमेवरच्या हालचाली आणि शस्त्रास्त्र साठे यांची माहिती लगेचा मिळू शकणार आहे. त्यामुळे आपलं परराष्ट्रांवरचं परावलंबित्त्वही बरचंस कमी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2009 11:14 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2009 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close