S M L

अखेर कॅम्पा कोलावर कारवाई; वीज,पाणी आणि गॅस कनेक्शन तोडलं

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2014 01:14 PM IST

अखेर कॅम्पा कोलावर कारवाई; वीज,पाणी आणि गॅस कनेक्शन तोडलं

23 जून : अखेर कॅम्पा कोलावर मुंबई पालिकेनं कारवाईला सुरुवात केलीय. कॅम्पाकोलातील अनधिकृत मजल्यांवर कारवाई सुरू झाली असून एकूण 12 टीम्स कॅम्पाकोलावरच्या या कारवाईत सामील आहेत. यात एकूण 90 फ्लॅट्सचा वीज आणि गॅस पुरवठा तोडण्यात आलंय.

 

कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी माघार घेतल्यानंतर आज पालिकेच्या कर्मचार्‍यांना कारवाई करण्यास मोकळीक मिळाली. आज कॅम्पाकोलाच्या रहिवाशांनी पालिकेच्या अधिकार्‍यांना सोसायटीची गेट्स उघडून आत यायची परवानगी दिली. पालिकेचे अधिकारी या अनधिकृत 102 फ्लॅट्सचं वीज आणि गॅस कनेक्शन तोडणार असल्याचं अगोदरच पालिकेनं स्पष्ट केलं होतं त्यानंतर अनधिकृत मजल्याची तोडफोड करण्यात येणार आहे.

 

रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतर कॅम्पा कोलातल्या रहिवाशांनी आंदोलन मागे घेतलं होतं. त्यामुळे कारवाईसाठी पालिकेचा मार्ग मोकळा झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2014 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close