S M L

रेल्वे दरवाढीविरोधात काँग्रेसचं मुंबईत आंदोलन

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2014 01:41 PM IST

रेल्वे दरवाढीविरोधात काँग्रेसचं मुंबईत आंदोलन

23 जून : मोदी सरकारने रेल्वे दरात 14 टक्के वाढ केल्यामुळे देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत. रेल्वेच्या भाडेवाढीविरोधात काँग्रेसही रस्त्यावर उतरली आहे. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सविनय कायदेभंग आंदोलन करत आहे.

काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सीएसटी ते ठाणे असा विनातिकीट प्रवास करुन भाडेवाढीचा निषेध करत आहेत. काँग्रेसने या आंदोलनाला सविनय कायदेभंग असं नाव दिलंय. नेहमी आक्रमकपणे आंदोलन करणारा भाजप आता बचावात्मक पवित्र्यात असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भाजपला कोंडीत पकडण्याची संधी साधणार असल्याचं दिसून येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2014 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close