S M L

1 जुलैपासून बेमुदत शाळा बंदचा शिक्षक संघटनेचा इशारा

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2014 05:25 PM IST

 356 techers23 जून : शाळा सुरू होऊन काही दोन आठवडे उलटले नाही तेच शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारा आदेश मागे घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केलीय.

राज्य सरकारनं हा आदेश मागे घेतला नाही तर 1 जुलैपासून बेमुदत बंदचा इशारा शिक्षक संघटनेनं दिला आहे. शुक्रवारी 27 जूनला शिक्षकांचा मुंबईत मोर्चा निघेल आणि या मोर्चाचं नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि नेते विनोद तावडे करतील असं शिक्षक आमदार रामनाथ मोते आणि नागो गणार यांनी सांगितलंय.

अनुदानितशाळांमधल्या अनेक शिक्षकांना सरकारने गेल्या आठवड्यात अतिरिक्त घोषित केलं होतं. यामुळे हजारो शिक्षकांच्या नोकर्‍यांवर गदा आलीय.

कोकणातही शिक्षक चिंतेत

तर दुसरीकडे स्टाफिंग पॅटर्नविरोधातला असंतोष कोकणातही दिसून येऊ लागलाय. पटसंखेचे नवे निकष लावून शिक्षकांना अतिरीक्त ठरवण्याच्या हालचाली शिक्षण विभागाकडून सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सुमारे अडीचशेहून जास्त शिक्षक आणि तेवढ्याच शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या नोकर्‍यांवर गदा आलीय.

तसंच ज्या शिक्षण सेवकांना तीन वर्षं पूर्ण झाली नसतील अशांना सेवेतून तत्काळ कमी करण्याच्या सुचनाही शिक्षण विभागाने संस्थाचालकांना दिल्या आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नुकसान करणार्‍या सरकारच्या या निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शाळांचे संस्थाचालक आणि मुख्याध्यापक एकवटले असून याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार या संघटनेने केला. येत्या 1 जुलैला जिल्ह्यातल्या सर्व माध्यमिक शाळा बंद ठेवून सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2014 05:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close