S M L

मंत्रालयात किरकोळ आग, यंत्रणा सपशेल फेल !

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2014 05:48 PM IST

मंत्रालयात किरकोळ आग, यंत्रणा सपशेल फेल !

1mumbai_mantralyat23 जून : राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात पुन्हा आगीमुळे गोंधळ उडाला. आज (सोमवारी) मंत्रालयात पुन्हा एकदा शॉर्टसर्किटमुळे किरकोळ आग लागली. आग तातडीने विझवण्यात जरी यश आलं असलं तरी सर्वत्र धूर पसरल्याने काही काळासाठी मंत्रालयातल्या कर्मचार्‍यांना बाहेर काढण्यात आलं होतं.

दोन वर्षांपूर्वी 21 जून 2012 ला मुख्य इमारतीला आग लागली होती. त्यात मंत्रालयाचे 4 मजले आगीत जळून खाक झाले होते. त्यानंतर मंत्रालयाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं, पण तरीही दर महिन्या-दोन महिन्यांनी शॉर्टसर्किटमुळे किरकोळ आगीच्या घडामोडी मंत्रालयात घडत असतात.

पण तरीही शॉर्टसर्किट झाल्यावर तात्काळ अलार्म न वाजणे, वीजपुरवठा तात्काळ बंद न होणे, अशा कठीण वेळी नेमकं काय करावं याचं प्रशिक्षण कर्मचार्‍यांना नसल्यानं अशा घटनांच्या वेळी मंत्रालयात एकच गोंधळ उडत असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2014 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close