S M L

क्रोएशिया आणि मेक्सिकोसाठी करो या मरोचा सामना

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2014 10:27 PM IST

क्रोएशिया आणि मेक्सिकोसाठी करो या मरोचा सामना

23 जून : फिफा वर्ल्डकपमध्ये आजच्या चौथ्या मॅचमध्ये ग्रुप एमधील दोन टीमसाठी करो या मरोचा मुकाबला रंगेल. आज रेसिफमधील अरिना पेरॅन्बुकोवर क्रोएशिया आणि मेक्सिकोदरम्यान भारतीय वेळेनुसार रात्री 1.30 वाजता ही मॅच रंगेल. क्रोएशियासाठी ही मॅच अत्यंत महत्वाची आहे. जर त्यांना नॉकआऊट स्पर्धेत जायचं असेल तर त्यांना ही मॅच जिंकावीच लागेल.

कारण मेक्सिकोपेक्षा ते एका पॉईंटनं मागे आहेत. या मॅचमध्ये ड्रॉ झाला तरीही मेक्सिको पुढच्या फेरीत जाईल. दोन्ही टीम्सनं याअगोदर चांगली खेळ केलाय. ब्राझीलकडून क्रोएशियाचा पराभव झाला होता. पण त्यांनी कॅमेरुनचा 4-0 नं धुव्वा उडवला होता. मेक्सिकोने कॅमेरुनचा 1-0 नं पराभव केला आहे. पण त्यांनी ब्राझीलशी बरोबरी केली होती. त्यामुळे आजची मॅच जिंकत कोण आपलं स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2014 10:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close