S M L

कॅम्पा कोलात लतादीदींच्या फ्लॅटचं वीज,पाण्याचं कनेक्शन तोडलं

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2014 01:09 PM IST

कॅम्पा कोलात लतादीदींच्या फ्लॅटचं वीज,पाण्याचं कनेक्शन तोडलं

24 जून : मुंबईतील वादग्रस्त कॅम्पाकोला इमारतीवर सध्या कारवाई सुरू आहे पण या इमारतीत गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचाही अनधिकृत फ्लॅट असल्याचं समोरं आलं होतं. लतादीदींच्या या अनधिकृत फ्लॅटवर पालिका अधिकार्‍यांनी कारवाई केली आहे. या फ्लॅटवरही या फ्लॅटची वीज आणि गॅस कनेक्शन तोडण्यात आलंय. लतादीदींनी काही दिवसांपूर्वी कॅम्पा कोलावासीयांची बाजू घेतली होती पण त्यांचा फ्लॅट असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे लतादीदींची सूर मावळला होता.

दरम्यान, आज दुसर्‍यादिवशी पालिकेनं कारवाईचा वेग वाढवलाय.ज्या फ्लॅट्सचं गॅस आणि वीज-पाण्याचं कनेक्शन तोडलंय, तिथले काही रहिवासी सामान बांधून निघून बाहेर पडले. आज सकाळी 11च्या दरम्यान, पुन्हा कारवाईला सुरुवात झाली. सध्या लगेच बांधकाम पाडलं जाणार नाही. पण बाकीच्या सेवा तोडण्याचं काम सध्या सुरू आहे. या इमारतीतल्या अनधिकृत मजल्यांवरचा वीज, गॅस आणि पाणी पुरवठा काल कापण्यात आला.

काल 55 घरांचं वीज कनेक्शन, 15 घरांच गॅस कनेक्शन, 3 घरांच पाणी कनेक्शन तोडण्यात आलं होतं. या कारवाईत एकूण 12 टीम्स सामील होत्या. यात पालिका कार्यालयातल्या वेगवेगळ्या विभागातल्या प्रत्येकी चार टीम्स होत्या. एकूण 90 फ्लॅट्सचा वीज, गॅस आणि पाणीपुरवठा तोडण्यात आला. सध्या रहिवाशी या कारवाईला अजिबात विरोध करत नाहीयेत. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर कालच कॅम्पा कोलावासीयांनी आंदोलन मागे घेतलं होतं. दरम्यान, कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी रहिवाशांवर नियमाप्रमाणे कारवाई सुरू राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2014 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close