S M L

सासवडमध्ये माऊलींचा मुक्काम; सोपनदेवांच्या पालखीचं होणार प्रस्थान

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2014 01:36 PM IST

5maulipalkhi_pune24 जून : ज्ञानोबा माऊलींची पालखी आज सासवड मुक्कामी आहे. सासवडमधून माऊलींचे धाकटे बंधू सोपानदेव यांच्या पालखीचं प्रस्थान होतं. त्यापूर्वी थोरले बंधू ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीकडून सोपानदेवांच्या पालखीला नैवेद्य पाठवला जातो.

हा नैवेद्य झाल्यावर मग सोपानदेवांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होतं. तर ज्ञानोबांच्या पालखीचा आजचा दिवस सासवडमध्येच मुक्काम असेल. उद्या माऊलींची पालखी जेजुरीकडे प्रस्थान ठेवणार आहे.

दरम्यान, तुकोबांच्या पालखीचा आज यवतमध्ये मुक्काम असणार आहे. लोणी काळभोरहून ही पालखी निघाली. कुंजीरवाडी आणि उरळी कांचनमध्ये तुकोबांच्या पालखीचे दोन विसावे असतील. आज रात्री ही पालखी यवतमध्ये मुक्काम करेल. यावेळी वारकरी पिठलं भाकरीचा आस्वाद घेतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2014 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close