S M L

सरकारला आली जाग, डॉ.भाभांच्या बंगल्याचं संग्रहालय करण्याची दाखवली तयारी

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2014 02:21 PM IST

dr homi bhabha bungalow24 जून : भारतीय अणु ऊर्जेचे जनक डॉ. होमी भाभा यांच्या बंगल्याचा 372 कोटींना लिलाव झाल्यानंतर राज्य सरकारला जाग आलीय.भाभा यांच्या बंगल्याचं संग्रहालयात रुपांतर करण्याची आमची इच्छा असल्याचं अणुऊर्जा विभागाने मुंबई हायकोर्टाला सांगितलं आहे.

कोर्टाने अणुऊर्जा विभागाला हस्तक्षेप याचिका करण्यास परवानगी दिली असून त्याबाबतच प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना केली आहे. 17 हजार 150 चौरस फुटांवरील या बंगल्याचा लिलाव न करता त्याला हेरिटेज दर्जा द्यावा किंवा त्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केलीय.

या बंगल्यात भाभा यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून आणलेल्या कलात्मक वस्तूंचा ठेवा आहे. शिवाय भाभा याच बंगल्यातून आपल काम करत होते. त्यामुळे या बंगल्याला राष्ट्रीय स्मारक किंवा हेरिटेज दर्जा दिला तर लोकांसाठी विशेष करुन विज्ञान क्षेत्राकडे वळू पाहणार्‍यांसाठी ती प्रेरक बाब असेल,असही या याचिकेत म्हटलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2014 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close