S M L

अंकुश राणेंचा खून झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट : सीआयडी तपास चालू

21 एप्रिल, कणकवलीउद्योगमंत्री नारायण राणे यांचे भाऊ अंकुश राणेंचा खून झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. ओरोस जिल्हा रुग्णालयानं अंकुश राणे यांच्या पोस्टमार्टमच्या रिपोर्ट दिला. या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये अंकुश राणे यांचा मृत्यू नाक, चेहरा आणि डोकं फोडल्यानं झाला असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्गातल्या निवडणुकीनं रक्तलांच्छित वळण घेतल्यांची चिन्हं दिसू लागली आहेत. नारायण राणे यांचे चुलत भाऊ अंकुश राणे 17 एप्रिलपासून कणकवलीतून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह 19 एप्रिलला रविवारी संध्याकाळी कणकवलीपासून 17 किलोमीटर अंतरावर असणा-या कासार्डे गावाजवळ चेहरा जाळलेल्या अवस्थेत सापडला होता. जेव्हा हा मृतदेह सापडला तेव्हा तो अंकुश राणे यांचा आहे यावर कणकवली पोलीस ठाम नव्हते. पोस्टमार्टम रिपोर्टचा अहवाल आला तसा सापडलेला मृतदेह अंकुश राणे यांचा असल्याचं कणकवली पोलिसांनी जाहीर केलं. अंकुश राणे यांच्या हत्येमुळे सिंधुदुर्गातल्या निवडणुकीनं रक्तलांच्छित वळण घेतलं आहे. अंकुश राणे यांची हत्या शिवसेनेनच घडवून आणल्याचा थेट आरोप नारायण राणेंनी केलाय. काल कणकवलीतल्या पत्रकारपरिषदेत ' सिंधुदुर्गात शिवसेनेची एकही सभा होत नव्हती. माझ्या भावाची हत्त्या घडवून आणण्यापाठी सेनेचा हात असल्याचे, ' आरोप नारायण राणे यांनी केले. तर शिवसेनेने या आरोपांचा इन्कार केला आहे. यावर ' हे आरोप म्हणजे नारायण राणे यांचं शिवसेनेला बदनाम करण्याचं काम असून, अंकुश राणे यांचा भावाचा खुन कुणी केला, याचा नीट तपास झाला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी केली आहे. पण आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडं देण्यात आला आहे. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीच्या सभेत प्रत्युत्तर दिलं आहे. स्वाभिमानी गांडुळांचा कोकणात सुळसुळाट झालाय, असा टोला उद्धव ठाकरेंनी राणेंना लगावला. __PAGEBREAK__ नारायण राणे मालवण विधानसभा मतदारसंघातून 1990 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर या मतदारसंघाच्या इतिहासात तीन मोठी खून प्रकरणं झाली. आणि आता नारायण राणेंचे चुलतभाऊ अंकुश राणे यांची हत्त्या कणकवलीमध्ये चर्चेचा विषय झालीय. आरोप आणि खटले : 1991 मध्ये सिंधुदुर्ग युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीधर नाईक यांची कणकवलीत हत्या झाली. यात थेट नारायण राणेच आरोपी होते. शिवसेनेचे आमदार परशुराम उपरकर आणि नारायण राणे यांच्यासह 13 जणांवर आरोपपपत्र ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे मंत्री असताना राणे कोर्टात हजेरी लावायचे. पण या प्रकरणातूनराणेंची निर्दोष मुक्तता झाली. 2002 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वादातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची हत्या झाली. कणकवलीपासून 15 किलोमीटर अंतरावरच्या शिवडावमध्ये ही हत्या झाली. नारायण राणे तेव्हा विरोधी पक्षनेते होते. या हत्येनंतर नारायण राणेंच्या कणकवलीतल्या बंगल्याची जाळपोळ झाली होती. कणकवली शहरातही जाळपोळ झाली. सत्यविजय भिसे हत्या प्रकरणात राणेंचे समर्थक राजन तेली यांच्यावरही आरोप होता. 2005 मध्ये मालवण विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी काही काळ शिवसेनेचे रमेश गोवेकर बेपत्ता झाले होते. या प्रकरणात शिवसेनेनं नारायण राणेंवर आरोप केला होता. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आहे. रमेश गोवेकरांचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. पण त्यांची हत्या झाली असावी असा आरोप आहे. आणि आता निवडणुकीच्या धामधुमीत हे अंकुश राणे हत्या प्रकरण झालंय. राणेंनी या प्रकरणात शिवसेनेवर ठपका ठेवला होता. अंकुश राणे यांचा खून झाला हे ओरोस पोस्टमार्टममधून आता उघड झालं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2009 06:27 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2009 06:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close