S M L

...तर कोस्टल रिंगरोड प्रकल्प केंद्र हाती घेईल -गडकरी

Sachin Salve | Updated On: Jun 25, 2014 09:49 PM IST

 66nitin_gadkari_art370

25 जून : मुंबईच्या कोस्टल रिंग रोडसाठी राज्य सरकारने केंद्राला विनंती केली असून हा प्रकल्प केंद्र सरकार हाती घेणार असं आश्वासन रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत दिलं. या प्रकल्पासोबतच वरळी-कुलाबा आणि न्हावा शेवा सी लिंक सोबत हा रिंग रोड असा एकूण 18 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असेल अशी माहिती गडकरी यांनी दिली.

राज्याच्या रस्ते विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा प्रकल्प तयार केला आहे. त्याचबरोबर रस्ते विकासासाटी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. देशातले व्याजदर प्रचंड आहेत हे पाहता थेट परकीय गुंतवणुकीतून रस्ते विकास करावा का याचाही विचार केंद्र सरकार करत आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2014 06:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close