S M L

एन.श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2014 02:31 PM IST

एन.श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड

26 जून : आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झालेले एन.श्रीनिवासन यांनी आपला दबदबा कायम ठेवलाय. आयसीसीच्या चेअरमनपदी एन. श्रीनिवासन यांच्या निवड झालीय.

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीमध्ये एन. श्रीनिवासन यांच्या पारड्यात 52 सदस्यांनी मतं पडली त्यामुळे श्रीनिवासन यांची बिनविरोध निवड झाली. श्रीनिवासन दोन वर्षांच्या कालावधीसाठी चेअरमनपदी राहणार आहे. सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदापासून दूर केले असले तरी आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी ते पात्र आहे असं कोर्टाने नमूद केलं होतं. त्यानंतर बीसीसीआयने श्रीनिवासन यांचं आयसीसीकडे नाव सुचवलं होतं. आयसीसीच्या सर्वोच्चपदी श्रीनिवासन यांची आता निवड झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2014 12:24 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close