S M L

आयपीएलमध्ये आज दोन मॅच

21 एप्रिल, डर्बनआज आयपीएलमध्ये टी-20चे दोन मॅच रंगणार आहेत. दोन्हीही मॅच डर्बनमध्ये खेळवल्या जाणार आहेत. यातली पहिली मॅच रंगेल ती किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान तर दोन्ही टीमना पहिल्या राऊंडमध्ये पराभवाचा धक्का बसल्यानं ही मॅच या दोन्ही टीमसाठी महत्वाची ठरणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबची कामगिरी पहिल्या मॅचमध्ये अतिशय निराशाजनक झाली होती. दिल्ली डेअर डेव्हिल्सकडून त्यांना तब्बल 10 विकेटनं पराभव पत्करावा लागला होता. पण आता दुसर्‍या मॅचमध्ये विजय मिळवण्यासाठी टीम सरसावली आहे. कॅप्टन युवराज सिंग, कुमार संगकारा, करण गोयल, रवि बोपारा, महेला जयवर्धने असे तगडे बॅटसमन या टीममध्ये आहेत. कोलकाता नाईट रायडर्सची स्थितीही पहिल्या मॅचमध्ये काहीशी अशीच होती. पहिल्या हंगामात आठव्या क्रमांकावर असलेल्या डेक्कन चार्जर्सनं त्यांचा पराभव केला होता. ब्रँडम मॅक्यूलम, ख्रिस गेल, सौरव गांगुली, ब्रॅड हॉग, लक्ष्मीरतन शुक्ला यांच्यावर आता दुसर्‍या मॅचमध्ये विजय मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे. आयपीएलमधली दुसरी मॅच असेल मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल या टीम्समध्ये.आयपीएलमधली पहिली मॅच जिंकून विजयी सलामी देणारी सचिन तेंडुलकरची मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा दुनिया हिला देंगेचा नारा देत दुसर्‍या मॅचसाठी सज्ज झाली आहे. कॅप्टन सचिन तेंडुलकर, सनथ जयुसर्या, शिखर धवन, जीम पॉल ड्युमिनी आणि ड्वेन ब्राव्हो असे तगडे बॅटसमन या टीममध्ये आहेत. तर झहीर खान, अभिषेक नायर आणि हरभजन सिंग हे बॉलर्सही चांगलेच फॉर्मात आहेत. मुंबई इंडियन्सची लढत देण्यासाठी राजस्थान रॉयलही सज्ज झालीये. पहिल्या मॅचमधील मानहानीकारक पराभव विसरुन दुसर्‍या मॅचमध्ये चांगली कामगिरी करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे... ग्रॅहम स्मिथ, स्वप्निल असनोडकर, युसुफ पठाण, मस्कारेहन्स आणि शेन वॉर्न असे तगडे बॅटसमन पुन्हा एकदा विजयी कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2009 09:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2009 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close