S M L

बनावट रेशनकार्ड आणि मतदार याद्यांप्रकरणी राज यांचं आव्हान

21 एप्रिल, नाशिक आचारसंहितेबरोबर बनावट रेशनकार्ड आणि खोट्या मतदार यांद्याकडेही लक्ष द्या असं आव्हान राज ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगाला केलं. बनावट रेशनकार्डच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिकमध्ये पत्रकारपरिषद झाली. त्यावेळी राज ठाकरे यांनी माझ्या सभांना होणारी गर्दी ही मतांमध्ये परिवर्तित होईल असा विश्वास नाशिक इथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत व्यक्त केला. पुण्यातून लादेन आणि अजमल कसाब यांच्या नावानं रेशन कार्ड मिळत असल्याचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या 19 एप्रिलच्या जाहीर सभेत पुराव्यांसहीत दाखवलं होतं. त्यावेळी सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. राज यांच्या आरोपांचा पुण्याचे जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी कसून तपास घेतल्यानंतर सरकारी अधिका-यांनी पत्रकारपरिषद घेतली. ' राज ठाकरे यांनी दाखवलेली रेशन कार्ड बोगस असून , कसाब आणि ओसामा यांच्या कारवाया उघड होण्यापूर्वीची तारीख या कार्डवर असल्याचं सरकारचं म्हणणं पडलं. ' कार्डांवर संबंधित पुरवठा अधिकार्‍याची सही नाही आणि वर्षभरापासून ती वापरात नाहीत, असं जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. एकंदरीत सरकारनं राज यांचा दावा खोटा ठरवत, अशा प्रकारचं कोणतंही रेशन कार्ड शहरातल्या कोणत्याही विभागातून वितरीत करण्यात आलं नसल्याचं सांगितलं.त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारपरिषद घेतली. ' मी सांगितलेलं खोटं वाटत असेल तर रेशन कार्डाचं शुटिंग करा असं राज ठाकरे म्हणाले. त्यावेळी निवडणुकीनंतर या रेशनिंगकार्डाच्या मुद्द्यावर कोर्टात जाणार असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं. समाजातला मोठा समूह माझ्या मागे आहे आणि या निवडणुकीत मनसे निश्चित खातं उघडेल असंही राज ठामपणे या पत्रकारपरिषदेत म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2009 11:18 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2009 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close