S M L

उस्ताद अमजद अली खान यांची सरोद गहाळ

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2014 05:35 PM IST

उस्ताद अमजद अली खान यांची सरोद गहाळ

ustad amjad ali khan sarod30 जून : सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांची सरोद ब्रिटीश एअरवेजकडून गहाळ झाल्याची बाब समोर आलीय. गेल्या दोन दिवसांपासून गायब झालेल्या सरोदवर ब्रिटिश एअरवेजने चुपी साधलीय. ब्रिटीश एअरवेज कारभारामुळे उस्ताद अमजद अली खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माझी सरोद मला परत आणून द्या ती माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे अशी विनंती खान यांनी केलीय.

उस्ताद अमजद अली खान आपल्या पत्तीसोबत लंडनमधल्या एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर उस्ताद ब्रिटीश एअरवेजच्या विमानाने परत येत असताना त्यांची सरोद गहाळ झाली. ब्रिटीश एअरवेजने याबाबत कोणतीही माहिती त्यांना दिली नाही.

मात्र या खान यांच्या तक्रारीनंतर 'ही सरोद शोधण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.' असं आश्वासन ब्रिटीश एअरवेजने दिलंय. 48 तास उलटून गेलेत पण आपली सरोद मिळालेली नाही, असं खान यांनी म्हटलंय. गेल्या 45 वर्षांपासून ही सरोद माझ्याकडे आहे आणि ती माझ्यासाठी खूप खास आहे. ही सरोद गहाळ झाल्याच्या प्रकारामुळे आपल्याला रात्रभर झोप आली नाही. मला असं वाटतंय की, माझ्या घरातला एक सदस्य घरातून निघून गेल्या अशी प्रतिक्रिया उस्ताद अमजद अली खान यांनी दिली.

ज्यावेळी विमानाने निघालो त्यावेळी सरोद विमानतळावर स्पेशल काऊंटरवर दिली होती. 28 तारखेला आम्ही दिल्लीत परतलो पण सरोद मिळाली नाही. आम्ही फर्स्ट क्लासचे प्रवासी होतो जर आमची ही परिस्थिती असेल तर बाकी प्रवाशांचं काय होणार असा सवालही खान यांनी उपस्थिती केला. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलंय, ते म्हणतात '1997 मध्ये माझ्या सरोदचं नुकसान केल्यानंतर ब्रिटीश एअरवेजने आता माझी सरोद गहाळ केली आहे. 48 तास उलटून गेलेत आणि मी अजूनही सरोद मिळण्याची वाट बघत आहे. ती माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2014 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close