S M L

मराठा आरक्षणाचा वाद पेटला, केतन तिरोडकरांवर शाईफेक

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2014 06:55 PM IST

मराठा आरक्षणाचा वाद पेटला, केतन तिरोडकरांवर शाईफेक

45ketan_tirodkar_maratha_arakashn30 जून : मराठा आरक्षणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. पण मराठा आरक्षणाचा वाद पेटलाय. सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांच्यावर हायकोर्टाच्या परिसरात शाई फेकण्यात आलीय.

मराठा महासंघाचे कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी शाई फेकली. मराठा आरक्षणाविरोधात केतन तिरोडकर यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलीय. यासंदर्भात आज (सोमवारी) कोर्टात सुनावणी होती.

यावेळी हायकोर्टाच्या आवारात दिलीप पाटील यांनी केतन तिरोडकर यांच्यावर शाई फेकली. या प्रकारनंतर पोलिसांनी पाटील यांना ताब्यात घेतलंय.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणाची पुढची सुनावणी 9 जुलैला होणार आहे. मराठा आरक्षणाचं सरकारकडून परिपत्रक निघत नाही तोपर्यंत आरक्षण मिळालं असं होत नाही, असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय. परिपत्रक निघाल्यानंतर सरकारची बाजू मांडली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2014 06:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close