S M L

अल्जेरियापुढे 'जर्मन' वादळ

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2014 10:10 PM IST

अल्जेरियापुढे 'जर्मन' वादळ

30 जून :   फिफा वर्ल्ड कपमध्ये आपली दहशत निर्माण करणारी जर्मनीचा मुकाबला होईल तो एकमेव मिडल ईस्टर्न टीम अल्जेरियाशी. पोर्टो अलिग्रेच्या स्टेडिओ रिओवर भारतीय वेळेनुसार रात्री 1.30 वाजता ही मॅच रंगेल. या संपूर्ण स्पर्धेत जर्मनीनं कमालीची कामगिरी केली आहे. पोर्तुगालचा धुव्वा उडवत त्यांनी आपल्या वर्ल्ड कप कॅम्पेनची सुरुवात दणक्यात केली. तर प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी गोल्सचा धडाका सुरू ठेवला. अल्जेरियानं कोरिया आणि रशियाला दणके देत नॉक आऊट फेरी गाठली आहे. पण जर्मनीपुढे त्यांचा कसा निभाव लागतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

जर्मनीचा प्रवास

  • - पोर्तुगालचा उडवला 4-0 नं धुव्वा
  • - घानाविरुद्ध मॅच ड्रॉ
  • - अमेरिकेचा केला 1-0 नं पराभव

अल्जेरियाचा प्रवास

  • - बेल्जियमकडून 2-1 नं पराभव
  • - द. कोरियाचा केला 4-2 नं पराभव
  • - रशियाविरुद्ध मॅच ड्रॉ

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2014 09:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close