S M L

राष्ट्रवादीची 'टिकटिक' राज्यापुरती ?

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2014 11:35 PM IST

23_news_sharad_pawar_news30 जून : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्षाची मान्यता धोक्यात आली आहे. यासंबंधी राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.

मतांची टक्केवारी घसरल्याने राष्ट्रवादीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याच कारणावरून राष्ट्रीय पक्षाची मान्यता का रद्द करू नये, अशी विचारणाही आयोगाने केली आहे. या नोटीशीला राष्ट्रवादीनंही उत्तर दिलंय. दरम्यान, राष्ट्रवादी आता प्रादेशिक पक्ष होणार असल्याची बोचरी टीका भाजपने केलीय.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अशा मातब्बर नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. राष्ट्रवादीला राज्यात फक्त चार जागेवर समाधान मानावे लागले.

त्यातच खुद्द शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाला खरा पण तो अपेक्षेइतका झाला नाही. सुप्रिया सुळेंचा मागील निवडणुकीत लाखभर मताधिक्यानी विजय झाल्या होत्या मात्र यावेळी फक्त हजाराच्या आकड्यातच सुळेंचा विजय झाला. विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केली खरी पण निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोट्यात चिंता पसरलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2014 09:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close