S M L

नायजेरियाचा पराभव करत फ्रान्स क्वार्टर फायनलमध्ये

Samruddha Bhambure | Updated On: Jul 1, 2014 02:14 PM IST

नायजेरियाचा पराभव करत फ्रान्स क्वार्टर फायनलमध्ये

01  जुलै : ब्राझिलियामध्ये झालेल्या मॅचमध्ये फ्रान्सने नायजेरियाचा 2-0ने पराभव करत फिफा वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे आता क्वार्टर फायनलमध्ये जर्मनीची गाठ पडणार आहे ती फ्रान्सशी. सुरुवातीला नायजेरियन टीम फ्रान्सला टक्कर देणार असं वाटत होतं पण नंतर मात्र हे चित्र बदललं. खेळ संपायला 10 मिनिटं राहिलेली असताना फ्रान्सच्या पॉल पोग्बाने पहिला गोल केला तर नायजेरियाच्या जोसेफ योबोने केलेल्या सेल्फ गोलमुळे फ्रान्सच्या पदरात आणखीन एक गोल पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2014 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close