S M L

जर्मनीची अल्जेरियावर 2-1ने मात

Samruddha Bhambure | Updated On: Jul 1, 2014 11:48 AM IST

जर्मनीची अल्जेरियावर 2-1ने मात

01   जुलै : एक्स्ट्रा टाइममध्ये अल्जेरियावर 2-1 ने मात करून जर्मनीने फिफा वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या मॅचमध्ये अल्जेरियाने बलाढ्य जर्मनीला जोरदार टक्कर दिली आहे. मॅचची निर्धारित वेळ संपेपर्यंत एकही गोल झाला नाही. त्यामुळे अर्ध्या तासाचा एक्स्ट्रा टाइम देण्यात आला. एक्स्ट्रा टाइमच्या दुसर्‍याच मिनिटाला जर्मनीच्या शुर्लेने पहिला गोल करत टीमला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 120व्या मिनिटाला जर्मनीच्या मेसट ओझीलने दुसरा गोलही नोंदवला या गोलसोबत जर्मन टीमचं क्वार्टर फायनलमधलं स्थान निश्चित झालं. पण अल्जेरियन टीमने हार मानली नव्हती. मॅच संपायला शेवटची पाच मिनिटे असताना अल्जेरियाच्या जाबौने गोल केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आता क्वार्टर फायनलमध्ये जर्मनीला फ्रान्सचे आव्हान असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2014 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close