S M L

अखेर 'ती' सरोद सापडली

Sachin Salve | Updated On: Jul 1, 2014 05:51 PM IST

अखेर 'ती' सरोद सापडली

01 जुलै : ब्रिटिश एअरवेजच्या गलथान कारभारामुळे उस्ताद अमजद अली खान यांची गहाळ झालेली सरोद अखेर सापडली आहे. ब्रिटिश एअरवेजने खान याची सरोद त्यांना परत केली आहे. त्याबद्दल खुद्द खान यांनी ट्वीट करुन सरोद मिळाली असल्याची माहिती दिली.

अमजद अली खान आपल्या पत्नीसोबत लंडनमधल्या एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर खान ब्रिटीश एअरवेजच्या विमानाने परत येत असताना त्यांची सरोद गहाळ झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून या सरोदचा शोध घेतला जात होतो. ब्रिटिश एअरवेजच्या या गलथान कारभारामुळे खान तीव्र नाराजी व्यक्त केली होती. खान यांच्याकडे ही सरोद गेल्या 45 वर्षांपासून सोबत होती. त्यामुळे खान यांनी सरोद गहाळ होणं म्हणजे माझ्या कुटुंबातला सदस्य सोडून जाणं असं माझ्यासोबत घडलंय अशी भावना व्यक्त केली होती.

अखेर दोन दिवसांनंतर खान यांची सरोद सापडली. ब्रिटिश एअरवेजने तातडीने ती खान यांच्या स्वाधीन केली. माझं माझ्या सरोदशी पुर्नमिलन झालंय. ब्रिटिश एअरवेजने माझी सरोद परत के ली आहे, तुम्ही सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद त्याचबरोबर मीडियाने केलेल्या सहकार्याबद्दल खान यांनी आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2014 02:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close