S M L

कल्याणमध्ये सेंच्युरी रेयॉन शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jul 1, 2014 10:25 PM IST

कल्याणमध्ये सेंच्युरी रेयॉन शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू

01 जुलै : कल्याण जवळील सेंचुरी रेयॉन शाळेत एका पाच वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. त्याच्या मृत्यूनंतर संतप्त पालकांनी आणि नातेवाईकांनी शाळेत तोडफोड केली. अर्जुन जिन्ना असं चिमुरड्याचं नाव आहे. अर्जुन नेहमीप्रमाणे आज शाळेत आला होता. मधल्या सुट्टीत आपल्या घरून आणलेला डबा खायला सुरुवात केली.

पण डबा खाताच त्याला उलट्या सुरू झाल्या. वर्गशिक्षिकेने अर्जुनला एका बेंचवर झोपवले आणि त्याच्या पालकांना बोलावून घेतले. त्यानंतर अर्जुनला रेयॉन कंपनीच्या रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी अर्जुनला मृत घोषित केलं. आपल्या मुलाला वेळीच हॉस्पिटलमध्ये नेण्यात न आल्यामुळे अर्जुनचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला.

या घटनेमुळे संतप्त पालकांनी शाळेच्या व्यवस्थपकांना जाब विचारला पण समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे पालकांनी शाळेची तोडफोड केली. यावेळी मुख्याध्यापकांना सुद्धा धक्काबुक्की केली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2014 10:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close