S M L

कांदा, बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत

Samruddha Bhambure | Updated On: Jul 2, 2014 08:59 PM IST

कांदा, बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत

02  जुलै :  कांदा आणि बटाट्याचा लवकरच जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

कांदा-बटाट्याच्या दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश झाल्याने आता साठेबाजीवर लगाम घालता येणार आहे. या साठेबाजांवर कारवाई करण्याचे राज्य सरकारांना आदेश देण्यात आले आहेत. महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालच्या आणि दारिद्र्यरेषेवरच्या कुटुंबांसाठी 50 लाख टन तांदूळ खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2014 08:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close