S M L

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा अहवाल: गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

Samruddha Bhambure | Updated On: Jul 3, 2014 11:11 AM IST

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा अहवाल: गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

03  जुलै :   नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2013 च्या अहवालानुसार महाराष्ट्र गुन्ह्यांच्या बाबतीत आघाडीवर आलाय. लहान मुलांविरुद्ध घडणार्‍या गुन्ह्यांबाबतीत महाराष्ट्राचा देशात चौथा क्रमांक लागतो. अल्पवयीन मुलींना विकणे, लैंगिक अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झालीये तर तुरुंगात असणार्‍या कैद्यांच्या मृत्यूच्या संख्येत सायबर क्राईममध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.सोशल साईटसद्वारे घोटाळे, लैंगिक शोषण, बदला घेण्याच्या प्रकारात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महिलांवरच्या गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. मुंबईत महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 89 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

देशात महिलाविरोधी गुन्ह्यांमध्ये दिल्लीचा पहिला तर मुंबईचा दुसरा क्रमांक आहे. अपहरण, विनयभंग, बलात्कार, नातेवाईकांकडून मानसिक शारीरिक अत्याचार अशा सर्वच गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.

  •  गुन्हेगारीचा विळखा: सायबर गुन्हे

- सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

- 2012मध्ये 561 तर 2013मध्ये 907 सायबर गुन्ह्यांची नोंद

- ऑनलाईन लैंगिक छळ : 2012मध्ये 101 गुन्हे दाखल होते तर 2013मध्ये या गुन्ह्यांची संख्या 233 होती

- ऑनलाईन आर्थिक घोटाळा : 2012मध्ये 147 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली तर 2013मध्ये 210 गुन्हे नोंदवण्यात आले

- ऑनलाईन बदनामी : 2012मध्ये अशा गुन्ह्यांची संख्या 38 होती, 2013मध्ये ही संख्या 75वर पोचली

- सायबर गुन्ह्यांमध्ये मुंबईचा क्रमांक चौथा

  • गुन्हेगारीचा विळखा : लहान मुलांवरचे अत्याचार

- लहान मुलांवरच्या अत्याचारात मुंबई दुसर्‍या स्थानावर

- मुंबई : लहान मुलांवरच्या अत्याचारात 74.5 टक्क्यांची वाढ

- महाराष्ट्र : लहान मुलींची विक्रीमध्ये मोठी वाढ

- 2012मध्ये फक्त दोन मुलींची विक्री, तर 2013मध्ये विक्रीचे 13 गुन्हे दाखल

- महाराष्ट्र : लहान मुलांच्या अपहरणात मोठी वाढ

- 2012मध्ये 893 मुलांचं अपहरण, तर 2013मध्ये अपहरणाचे 1698 गुन्हे दाखल

- महाराष्ट्र : बलात्कारांच्या गुन्ह्यातही वाढ

- 2012मध्ये 917 गुन्हे तर 2013मध्ये 1546 गुन्ह्यांची नोंद.

  • गुन्हेगारीचा विळखा : महिलांवरचे अत्याचार

- बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

- बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये दिल्लीपाठोपाठ मुंबईचा क्रमांक

- 2013मध्ये महाराष्ट्रात 3063 गुन्ह्यांची नोंद

- नातेवाईकाकडून होणार्‍या बलात्काराच्या गुन्ह्यातही महाराष्ट्र आघाडीवर

- नातेवाईकाकडून होणारे बलात्कार : 108 गुन्हे

- मुंबई : 43 गुन्ह्यांमध्ये शेजारच्या वक्तीकडून बलात्कार

  • गुन्हेगारीचा विळखा : कोठडीतले मृत्यू

- पोलीस कोठडीत मृत्यू होण्याच्या गुन्ह्यांमध्येही महाराष्ट्र आघाडीवर आहे

- 2001पासून 2013पर्यंतच्या 13 वर्षांच्या काळात 10 वर्षं महाराष्ट्र या गुन्ह्यांमध्ये आघाडीवर आहे

- 2013मध्ये 35 जणांचा पोलीस लॉकअपमध्ये मृत्यू झाला

- तर गेल्या 15 वर्षांत महाराष्ट्रात 330 जणांचा लॉकअपमध्ये मृत्यू झालाय

- पण, यातल्या एकाही प्रकरणात कुठल्याही पोलिसाला दोषी ठरवण्यात आलेलं नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2014 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close