S M L

बीड आणि माढा वगळता राज्यात मतदानाला शांततेत सुरुवात

23 एप्रिल बीड आणि माढा वगळता राज्यात मतदानाला शांततेत सुरुवात झाली. महाराष्ट्रात 25 मतदारसंघांचं भवितव्य आज निश्चित होतंय. मतदान चालू असताना आतापर्यंत कुठंही अनुचित प्रकार घडलेला नाही. ज्येष्ठ नागरिकांचाही मतदानाला मोठा प्रतिसाद मिळतोय. 89 वर्षांच्या यशस्विनी मस्करांनी पुण्यात केलं आवर्जून मतदान केलं. पुण्यात सुरेश कलमाडी यांनी मतदान केलं. कलमाडींना त्रासदायक ठरणारे डी.एस. कुलकर्णी यांनीही मतदान केलं. तर भाजपचे पुण्यातले उमेदवार अनिल शिरोळे यांनीही परिवर्तनाची आशा करत मतदान केलं. तर नाशिकमध्ये बसपाचे उमेदवार सुधीरदास यांनीही मतदान केलंय. तर तिकडे नीलेश राणेंना टफ फाईट देणार्‍या सुरेश प्रभुंनीही मतदानं केलं. सुशीलकुमार शिंदे यांनीही आपल्या परिवारासोबत सोलापूरमध्ये मतदान केलं. सोलापूर मतदारसंघ यावेळी राखीव झाला आहे. सुशीलकुमार शिंदे आणि भाजप नेते शरद बनसोडे यांच्यात यंदा चुरस होणार आहे. काँग्रेसचे राज्य प्रचार प्रमुख बाळासाहेब विखे-पाटील यांनी प्रवरा परिसरातील लोणी इथल्या मतदान केंद्रावर मतदान केलं. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांनीही मतदान केलं. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.पद्मसिंह पाटील यांनी तेर या गावी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. या भागात सकाळपासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. नाशिकमधील लोकसभा निवडणुकीचे मनसेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांता नलावडे यांच्यात लढत होतेय.यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या मतदारसंघातून उभे राहायचे.पण सुप्रिया सुळेंना संसदेत पाठवण्यासाठी पवारांनी बारामतीऐवजी माढा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. नंदुरबारमधल्या तोरणमाळ आदिवासी पट्‌ट्यात पोहचण्यासाठी कर्मचार्‍यांनी एव्हीएम मशीन्स घेऊन 15 किलोमीटरची पायपीट केली.बीडमध्ये माजलगाव तालुक्यातल्या रामनगर तांडा इथे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात मतदानावरून झालेल्या हाणामारीत चार जण जखमी झालेत. जखमीत एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांना अटक आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2009 08:57 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2009 08:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close