S M L

'यशानं हुरळून जाऊ नका, विधानसभेच्या कामाला लागा'

Sachin Salve | Updated On: Jul 3, 2014 04:45 PM IST

'यशानं हुरळून जाऊ नका, विधानसभेच्या कामाला लागा'

22dev_fadanvis03 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आता रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक अंधेरी क्रीडा संकुलात सुरू आहे.

त्यामध्ये बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या यशाने हुरळून जाऊ नका, विधानसभेवर लक्ष केंद्रीत करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.

तसंच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये भाजपला मजबूत करावं लागणार आहे. त्यासाठी बूथ यंत्रणेवर विशेष मेहनत घेतली जाणार आहे. लोकसभेत योग्य ते परिवर्तन करण्यात आले हेच परिवर्तन महाराष्ट्रातही करायचंय आणि हेच आपलं लक्ष असणार असंही फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2014 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close