S M L

इराकमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय नर्सेसना दुसरीकडे हलवलं

Sachin Salve | Updated On: Jul 3, 2014 11:49 PM IST

इराकमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय नर्सेसना दुसरीकडे हलवलं

2iraq_indian_nurs03 जुलै : इराकमधली परिस्थिती आणखी चिघळली. इराकमध्ये आयसीस दहशतवाद्यांच्या ताब्यातील 46 भारतीय नर्सेसना तिक्रीतमधून दुसरीकडे हलवलंय. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिलीय.

या नर्सेसना बसमधून हलवण्यात आलंय, असं केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनीही सांगितलंय.या बसेसने नर्सेसना नेत असताना या बसच्या बाहेर स्फोट झाला, अशी माहितीही त्यांनी दिली. पण या सर्व नर्सेस सुरक्षित आहेत. पण, त्यांना कुठे नेण्यात आलंय, याची माहिती अजून मिळालेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून इराकमध्ये यादवी माजलीय. आयसीसच्या दहशतवाद्यांनी इराकवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. या अगोदर 40 भारतीय या दहशतवाद्यांच्या ताब्यात होते पण या सर्व सुरक्षित असून सर्वांची सुटका झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2014 10:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close