S M L

'खाप'पंचायत, हक्काच्या घराची जागा मागितली म्हणून कुटुंब वाळीत

Sachin Salve | Updated On: Jul 3, 2014 11:03 PM IST

'खाप'पंचायत, हक्काच्या घराची जागा मागितली म्हणून कुटुंब वाळीत

342jalgaon_jaat_panchyat03 जुलै : जात पंचायतींचे अघोरी कृत्य देशभर चिंतेचा विषय ठरत असताना जळगाव तालुक्यातल्या वाकोदमध्ये भटक्या जोशी कुटुंबाला जात पंचायतीचा फटका बसला आहे. स्वत:चं बळकावलेले घर परत मिळण्याची मागणी या कुंटुंबाने केली म्हणून जात पंचायतीने त्यांना बहिष्कृत केले आहे. सामाजिक कार्यक्रमात बोलवणे तर सोडाच, समाजात व गावात ज्यांनी त्यांना आमंत्रण दिले त्याच्याही घरी समाजाचा कोणीही जाणार नाही, असं फर्मान वाकोदच्या जोशी पंचायतीने काढलाय.

वाकोद (ता. जामनेर) येथील मन्साराम राधू जोशी याची वाकोज रस्त्यावर जागा होती. भटके असल्याने जोशी कुटुंबीय या गावाहून त्या गावी गुजराण करीत होते. वाकोद येथीलच अशोक भिसे यांच्या घराचे बांधकाम सुरू होते, त्यांनी जोशी कुटुंबाला विनवणी करून त्याच्या जागेत राहू देण्याची परवानगी मागितली. जातीचा व दूरचा नातेवाईक असल्याने मन्साराम जोशी तशी परवानगी दिली. मात्र नंतर ही जागा अशोक भिसे, साहेबराव भिसे, शेषराव भिसे यानी बळकावून त्यावर कायमचा ताबा मिळवला. समाजातील वाद असल्याने मन्साराम यानी समाज पंचायतीचे सर्वेसर्वा अध्यक्ष सुरेश विठ्ठल जोशी यांच्याकडे तक्रार केली. जागा परत मिळवून देण्याची मागणीही अनेक दिवसापासून ते करत आहेत. मात्र जागा तर मिळालीच नाही, उलट मन्साराम व त्याच्या कुंटुबियाना जातीतून काढून टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

कुटुंबाची जमीन परत मिळण्यासाठी मदत करा अशी मागणी करण्यासाठी मन्साराम यांची पत्नी रखमाबाई शनिवारी (ता.28) संध्याकाळी सुरेश जोशी यांच्या घरी गेल्या होत्या. येथे तुमचा वाद आहे तुम्हीच निपटा असे उत्तर मिळाले. नंतर काही तासांनी त्यानी वाद घालून मारहाण केली. रूखमाबाईच्या पोटावर धारदार शस्त्राने हल्लाही केला, डोक्याचे केस धरून रस्त्यावर मारहाण करण्यात आली. कुटुंबाला छत नाही, पोलीस तक्रार घेत नाही, पंचायतीने जातीतून काढल्याने माझ्या मुलाबाळाचे लग्न होणार नाही, मुलगीही घरी बसेल, वाकोदला राहण्यासाठी आल्यास कुटुंबच जिवंत जाळून मारू अशी धमकी देण्यात आली असून पत्नीला शनिवारी मारहाण करूनही पहूर पोलिसानी दखल घेतली नाही. आता आमचा वाली कोणी? असा सवाल मन्साराम पाटील यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2014 11:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close