S M L

नितेश राणेंमुळे सिंधुदुर्ग काँग्रेसमध्ये उघड फूट

Sachin Salve | Updated On: Jul 4, 2014 04:53 PM IST

नितेश राणेंमुळे सिंधुदुर्ग काँग्रेसमध्ये उघड फूट

 32niteish rane04 जुलै : सिंधुदुर्गात उद्योगमंत्री नारायण राणेंचे धाकटे चिरंजीव नितेश राणे यांच्या कटू सत्यामुळे भलताच वाद निर्माण झालाय. नितेश राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे सिंधुदुर्ग काँग्रेसमध्ये उघड उघड फूट पडल्याचं समोर आलंय.

राणे नाव चालत नसेल तर तेली, पडते, कुडाळकर, सावंत यांनी विधानसभेला उभं राहावं, आम्ही त्यांचे कार्यकर्ते बनून त्यांना निवडून आणू असं विधान नितेश राणे यांनी केलं होतं. सिंधुदुर्गात 1 जुलैला पत्रकार परिषदेत राणेंनी हे विधान केलं होतं.

त्यामुळे राणेंचे कट्टर आणि अत्यंत विशासू समजले जाणारे समर्थक राजन तेली, संजय पडते आणि काका कुडाळकर नाराज झाले. या तिघांनीही आपआपल्या सहीने पत्रकं काढून नितेश राणेंच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.

खुद्द राणेंच्याच समर्थकांनी नितेश राणेंविरोधात घेतलेल्या या उघड भुमिकेमुळे सिंधुदुर्गातल्या काँग्रेसमध्ये निलेश राणेंच्या पराभवानंतर फूट पडल्याचं समोर आलंय. तर दुसरीकडे नितेश राणेंच्या या भूमिकेचं समर्थनही सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी सुरू झालं असून आता यावर नारायण राणे काय भूमिका घेत आहेत यावर सगळं अवलंबून असल्याचं बोललं जातंय.

नितेश राणेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

 

1: लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचं विश्लेषण आम्ही केलंय. जिल्ह्यात मोदींची लाट नव्हती.

2: आमचे काही कार्यकर्ते कार्यकर्ते न राहता ठेकेदार झाले आहेत. नारायण राणेंच्या दारासमोर त्यांनी दुकानं मांडलीत. ही दुकानदारी बंद करणार.

3: राणे नाव चालत नसेल तर तेली, सावंत, पडते आणि कुडाळकर यांनी निवडणुकीला उभं रहावं आम्ही त्यांचे कार्यकर्ते बनून त्यांना निवडून आणू.

4: राणेंच्या नावाचा वापर करून कार्यकर्त्यांकडूनच जमिनी बळकावल्या जातायत. विकासकामं निकृष्ट केली जातायत त्याचाही फटका या निवडणुकीत बसलाय.

राजन तेलींची नाराजी

1: आम्ही कुठल्या कंपनीचे नोकर नाही. आम्ही राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. आमच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, माणिकराव ठाकरे आणि नारायण राणे आहेत.

2: आम्हाला बोलण्याचा, जाब विचारण्याचा आणि कारवाई करण्याचा अधिकार वरील नेत्यांनाच आहे. दुसर्‍या कुणालाही नाही.

3: 1987 सालापासून नारायण राणेंबरोबर प्रामाणिक आहे. त्यांच्या सुख,दु;खात सहभागी आहे. पदासाठी मी कधीही लाचारी केली नाही.

4: मी माझ्या प्रांतिक सदस्याचा राजीनामा दिलाय . राणेंनी सांगितलं तर पुन्हा एकदा देईन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2014 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close