S M L

राष्ट्रवादीचं दबावतंत्र, जागा द्या नाहीतर स्वबळावर लढू !

Sachin Salve | Updated On: Jul 5, 2014 05:42 PM IST

24ncp_samana05 जुलै : निम्म्या जागा मिळाल्या तर काँग्रेससोबत विधानसभा निवडणुकीत लढू असा व्यक्तीगत इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांच्या पावलावर पाऊल टाकलंय. जागावाटपासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं दबावतंत्र सुरू आहे.

राष्ट्रवादीचा कल्याणमध्ये आज (शनिवारी) निर्धार मेळावा होतोय. त्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा स्वबळावर लढण्याचा सूर दिसून येतोय. राष्ट्रवादी अधिक मजबूत होण्यासाठी नेत्यांनी विधानसभा स्वबळावर लढवण्याचा विचार करावा, अशी मागणीच राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील यांनी केली.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 288 जागापैकी 144 जागा लढवण्याची इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती. यावर चर्चा करण्यासाठी कोअर कमिटी स्थापन करण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं.

याबाबत काँग्रेससोबत चर्चा केली जाईल आणि त्यातून मार्ग निघेलच, पण मार्ग मिळाला नाही तर आमची 288 जागा लढवण्याची तयारी असल्याचं तटकरेंनी म्हटलंय. पुढचे तीन महिने अंतर्गत मतभेद बाजूला सारा आणि एकत्र कामाला लागा असं आवाहनही तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2014 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close